राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांकडे तर निकालानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम सुरू

राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांकडे तर निकालानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम सुरू

| Updated on: Feb 06, 2024 | 10:51 PM

काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल दिला. या निकालानुसार घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांना मिळाला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीत सुरू

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल दिला. या निकालानुसार घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांना मिळाला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार…आमचा पक्ष, आमचं चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असे लिहिलेला पवारांचा फोटो राष्ट्रवादी गटाकडून सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करण्यात येत आहे. नुकतंच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.शरद पवार यांनी शुन्यातून पक्ष उभा केला. शुन्यातून स्वत:चं आयुष्य उभं केलं. त्यांचं कुणीही काका, मामा, वडील राजकारणात नव्हते. त्यांनी स्वत: सुरु केलेला हा पक्ष आहे. ते पक्षाचे फाऊंडर मेंबर असूनही शुन्यातून सुरु केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Published on: Feb 06, 2024 10:51 PM