दीपक केसरकरांनी जमिनीवर राहून राजकारण करावे
निलेश राणेंनी सांगितले की, त्यांना मंत्रिपद मिळू आगार नाही मिळू राणेंच्या राजकारणावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दीपक केसरकरांनी जमीनवर राहून राजकारण करावं, स्वतः विश्वगुरू बनण्याचं काम करू नये नाही तर राणे पिता पुत्र तुमचं राजकारण काय आहे आणि कसं थांबवायचं हे माहिती आहे अशी टीका निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. दीपक केसरकर यांनी काल राणे पुत्रांना वरिष्ठांनी सांगायची गरज असल्याचे वक्तव्य त्यांनी काल केले होते, त्यानंतर निलेश राणे यांनी त्यांच्या राजकारणावर बोलत सध्याच्या प्रवक्ते पदाबद्दलही त्यांनी टीकाटिपणी केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गाची कशी वाट लावली यावरही त्यानी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना मंत्रिपद मिळू आगार नाही मिळू राणेंच्या राजकारणावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
