Manikro Kokate : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यानं कोकाटेंना पाठवले 5,550 रूपये अन् घातलं साकडं म्हणाला माझ्यासाठी रमी…

Manikro Kokate : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यानं कोकाटेंना पाठवले 5,550 रूपये अन् घातलं साकडं म्हणाला माझ्यासाठी रमी…

| Updated on: Jul 25, 2025 | 12:47 PM

निफाड तालुक्यातील देवगाव येथील तरुण शेतकऱ्याने 5 हजार 550 रुपयांची मनीऑर्डर थेट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवत एक वेगळंच साकडं घातलं आहे. म्हणाला... माझ्यासाठी रमी खेळा आणि मला....

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या देवगावमधील शेतकरी योगश खुळे या शेतकऱ्याने राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एक साकडं घातलंय. माझ्यासाठी खेळा काही तरी जिंका आणि मला पाठवा असं साकडंच या शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना घातल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन बियाणं विकून तरूणाने तब्बल पाच हजार पाचशे पन्नास रूपयांची मनी ऑर्डर माणिकराव कोकाटेंना पाठवली आहे. योगेश खुळे असं म्हणाला की, ‘सांगताना शोकांतिका वाटते की मी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातील शेतकरी आहे. शेतं पीकाची मोठी अडचण आहे. ही माझीच नाही तर पंचक्रोशीतील सर्वच शेतकऱ्यांची समस्या आहे. त्यामुळे माझ्या कृषीमंत्र्यांना विनंती आहे. मी पाठवलेल्या पैशांचा एक डाव रमीचा खेळावा आणि त्यातून मला पैसे मिळवून द्यावे’, अशी विनंतीच या शेतकऱ्याने केली आहे.

Published on: Jul 25, 2025 12:47 PM