Nitesh Rane  : नितेश राणे यांना कोर्टाकडून मोठा दिलासा

Nitesh Rane : नितेश राणे यांना कोर्टाकडून मोठा दिलासा

| Updated on: Jun 02, 2025 | 11:04 AM

2017 मध्ये घडलेल्या एका प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयाने मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी भाजप मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना कोरतकडून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयाने राणे आणि इतर ३० जणांना निर्दोष मुक्त केले आहे. यामध्ये त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यावर मासा फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश (सिंधुदुर्ग) यांच्या न्यायालयाने २१ मे रोजी निकाल दिला, ज्याची माहिती रविवारी उपलब्ध झाली. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, अधिकाऱ्याने आपल्या साक्षीत असे म्हटले नाही की राणेने मासे त्याच्यावर फेकले. न्यायालयाने म्हटले की, पुराव्यांनुसार, राणेंसोबत असलेल्या लोकांनी अधिकाऱ्यावर मासे फेकले. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Published on: Jun 02, 2025 11:04 AM