Video | अनिल परबांना ईडीची नोटीस, नितेश राणे यांची प्रतिक्रिया
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांच्या ईडीच्या नोटिशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही.
मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांच्या ईडीच्या नोटिशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही. घाबरण्याचं कारण नाही, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे. नितेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हे आव्हान दिलं आहे. अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना… नोटीसच मिळणार होती… आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 29, 2021 08:27 PM
