Raj- Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंविरोधात उत्तर भारतीय नेते आक्रमक, थेट आव्हानाची भाषा

Raj- Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंविरोधात उत्तर भारतीय नेते आक्रमक, थेट आव्हानाची भाषा

| Updated on: Jul 06, 2025 | 10:41 AM

Raj - Uddhav Thackeray News : ठाकरे बंधूंच्या मराठीच्या आक्रमक पवित्र्यावरून उत्तर भारतीय नेत्यांकडून आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

ठाकरे बंधूंच्या विरोधात आता उत्तर भारतीय नेते मैदानात उतरले आहेत. थेट आव्हानाची भाषा या नेत्यांकडून करण्यात आली आहे. मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा,असं म्हणत भाजपचे माजी खासदार दिनेश यादव यांच्याकडून मग्रुरीची भाषा वापरण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्ला यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे. तर बिहारच्या पप्पू यादव यांच्याकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधु काल 18 ते 19 वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. राज्यात हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर काल दोन्ही भावांकडून विजय मेळावा घेण्यात आला. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधु आक्रमक होत एकत्र आल्यानंतर आता उत्तर भारतीय नेते मात्र ठाकरे बंधूंच्या या भूमिकेवर चांगलेच संतापलेले दिसून येत आहेत. थेट आव्हानाची भाषा आता या नेत्यांकडून केली जात असल्याने यावर शिवसेना उबाठा गट आणि मनसेकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 06, 2025 10:40 AM