Chhagan Bhujbal : सावधान, त्यांचं टार्गेट ओबीसी नाही फडणवीसच.. मुळावर उठतील त्यांना आडवे करा, भुजबळांचा जरांगेंवर घणाघात
बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठा समाजासाठी काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पडळकर आणि हाके यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बीडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठा समाजासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला. या सभेत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांना दरिंदे पाटील असे संबोधत, ओबीसींच्या मुळावर उठणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले. भुजबळ यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही टीका केली. विखे-पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर देऊन विखार पसरवला असा आरोप भुजबळांनी केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सावध करत, जरांगे-पाटलांचे खरे लक्ष्य देवेंद्र फडणवीस असल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांनी जरांगे-पाटील मराठ्यांशी दगाफटका करत असून, काही मूठभर लोकांसाठी राजकीय डाव खेळत असल्याचा आरोप केला.
