Laxman Hake : भुरट्या, स्ट्रीट डॉग… संघर्ष पेटला, माझे पुतळे नाही मला जाळ… लक्ष्मण हाकेंनी थेट कोणाला दिलं चॅलेंज?

Laxman Hake : भुरट्या, स्ट्रीट डॉग… संघर्ष पेटला, माझे पुतळे नाही मला जाळ… लक्ष्मण हाकेंनी थेट कोणाला दिलं चॅलेंज?

| Updated on: Aug 25, 2025 | 3:48 PM

बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बीडमधील ओबीसी समाजाच्या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करत गेवराई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, माझे पुतळे काय जाळतो… मलाच जाळ असं थेट आव्हान लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलंय. तर लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या या आव्हानानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील त्यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. लक्ष्मण हाके हा स्ट्रीट डॉग आहे. त्याला जेवढं भुकांयचं तेवढं भुंकू द्या, असा पलटवार विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केलाय.

Published on: Aug 25, 2025 03:48 PM