Mumbai | ओमिक्रॉन विषाणूसाठी मुंबई महापालिकेचा प्लॅन काय ?
राज्यात ओमिक्रोनचा पहिला रुग्ण आढळला आहे, मुंबईला त्याचा सर्वात जास्त धोका आहे. मुंबई महापालिकेने त्याला रोखण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे.
मुंबईः ओमिक्रॉनचे 30 संशयित मुंबई आढळल्यानंतर महापालिकेने (BMC) तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विदेशातून येणाऱ्यांसाठी हा पंचसूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आज याची माहिती मुंबईच्या महापौर किशोऱी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
