महाराष्ट्रामध्ये सुद्धा चाईल्ड पॉर्नोग्राफीचं रॅकेट? सीबीआयची मोठी कारवाई

| Updated on: Sep 25, 2022 | 6:30 AM

ऑपरेशन मेघचक्रच्या या नावावे सीबीआयची विशेष मोहीम, महाराष्ट्रासह एकूण 20 राज्यात छापेमारी

Follow us on

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने (CBI) शनिवारी मोठी कारवाई केली. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान, महाराष्ट्रातही सीबीआयने काही ठिकाणी छापे (CBI Raids) टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातो आहे. त्यासाठी शनिवारी सीबीआयने धडक कारवाईचा बडगा उगारला आणि छापे टाकले. सीबीआयने देशभरात ऑपरेशन मेघचक्र (Operation Meghchakra) राबवलं. या ऑपरेशन अंतर्गत चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणाविरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. महाराष्ट्रासह एकूण 20 राज्यात सीबीआयने छापे टाकले. यात 26 ठिकाणांचा समावेश अशल्याचं सांगितलं जातंय. इंटरपोलच्या माध्यमातून सिंगापूरमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफी केली जात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीबीआयकडून आता देशात कसून तपास केला जातोय.