India Pakistan War : पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्कराकडून पोलखोल, थेट लावला व्हिडीओ अन् सांगितलं काय खरं काय खोटं

India Pakistan War : पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्कराकडून पोलखोल, थेट लावला व्हिडीओ अन् सांगितलं काय खरं काय खोटं

| Updated on: May 10, 2025 | 12:26 PM

ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर करत पाकिस्तानने संपूर्ण सीमेवर आक्रमक कारवाया सुरूच ठेवल्या. मात्र भारताने हल्ले करून प्रत्युत्तर दिले. बघा कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या...

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सचिव आणि रक्षा मंत्रालयातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार हल्ला होत असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानकडून भारतीय लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले असून श्रीनगरसह अनेक ठिकाणी हवाई घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर दिले. उधमपूर, भटिंडा सारख्या ठिकाणी मोठ्या उपकरणांचे नुकसान झाले. पंजाब एअरवे स्टेशन जाळण्याचा प्रयत्न पाकने केला. अनेक ठिकाणी पाकिस्तानने वैद्यकीय केंद्रांसह लष्करी तळांना लक्ष्य केले. भारतीय सैन्याने अनेक ठिकाणी याला प्रत्युत्तर दिले. तर पाकिस्तानने नागरी विमानांचा गैरवापर केला. मात्र त्याला देखील भारताने प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने संयमाने काम केले. पाकिस्तानने चुकीच्या माहितीचा वापर करून सुरतगड, चंदीगड सारख्या शहरांमध्ये दारूगोळा नष्ट झाल्याचे वृत्त दिले, असे त्यांनी सांगितले तर भारतीय सैन्याने प्रभावी आणि तुलनात्मक प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याची तैनाती वाढत आहे. भारतीय सशस्त्र दलांना तणाव नको असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: May 10, 2025 12:19 PM