पेन्सिल तुटली की पेन हे विचारु नका, थेट..; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंग काय म्हणाले?

पेन्सिल तुटली की पेन हे विचारु नका, थेट..; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंग काय म्हणाले?

| Updated on: Jul 28, 2025 | 4:49 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही चर्चा सुरू केली.

पहलगाम येथे झालेल्या 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हंटलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सोमवारी दुपारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही चर्चा सुरू केली. लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी १६ तासांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. यावेळी राजनाथ सिंग यांनी ओपेरेशन सिंदूर विषयी माहिती दिली.

पुढे बोलताना राजनाथ सिंग यांनी सांगितलं की, ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, आणि यासाठी मी सर्व पक्षांचे आभार मानतो. ही आपल्या लोकशाहीची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले आहे, परंतु ते पूर्णपणे संपलेले नाही. जर पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली, तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल. आम्ही लक्ष्मण रेखा आखली आहे, आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

आमचे सरकार दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेच्या धोरणाशी कोणतीही तडजोड करणार नाही. एका आंतरराष्ट्रीय बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावरील संयुक्त निवेदन सौम्य करण्याचा प्रयत्न होत होता, तेव्हा आम्ही स्पष्ट केले की, जोपर्यंत ठोस आणि स्पष्ट युक्तिवाद मांडला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही त्या निवेदनावर सहमती दर्शवणार नाही, असंही राजनाथ सिंग यांनी सांगितलं.

Published on: Jul 28, 2025 04:49 PM