15-15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्… संजय राऊतांनांचा मोठा दावा, थेट…

15-15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्… संजय राऊतांनांचा मोठा दावा, थेट…

| Updated on: Jun 17, 2026 | 11:41 AM

राज्यात सध्या शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असून रविवारी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीनंतर या चर्चांना आणखी वेग आला. या बैठकीला फक्त 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार दिल्लीला पोहोचल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले. त्यांच्यासोबत गटनेते अरविंद सावंत, मुख्य प्रतोद अनिल देसाई आणि राजाभाऊ गोडसे उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही खासदारांना 50 कोटींचा “हमी भाव” दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15-15 कोटी रुपये पोहोचवल्यानंतरच काही जण दिल्लीला येतील, त्याशिवाय ते चार्टड विमानात चढतही नव्हते, अशी माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुढे राऊत म्हणाले, आमच्या चिन्हावर जिंकायचं आणि पैशांसाठी गद्दारी करण्याचा यांना अधिकार नाही, सोडणार नाही यांना… हे साले… देशभारात ही जी फोडाफोडी केली आहे, यांना जनतादेखील सोडणार नाही,

Published on: Jun 17, 2026 11:35 AM
Follow Us