एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात - Devendra Fadnavis

‘एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात’ – Devendra Fadnavis

| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 9:36 PM

एखाद्याचे लग्न झाले किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता हा टोला लगावला. मात्र, त्यांच्या टीकेचा रोख ठाकरे सरकारवर असल्याचं बोललं जात आहे.

ठाणे: भाजप (bjp) सरकारच्या काळात झालेल्या कामाचं महाविकास आघाडीकडून (maha vikas aghadi) श्रेय घेतलं जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांनी सपाटा लावला आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे. एखाद्याचे लग्न झाले किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता हा टोला लगावला. मात्र, त्यांच्या टीकेचा रोख ठाकरे सरकारवर असल्याचं बोललं जात आहे.