मशिदींवरील भोंगे काढायला ‘आरपीआय’चा विरोध, पक्ष मशिदींचे रक्षण करणार – आठवले

मशिदींवरील भोंगे काढायला ‘आरपीआय’चा विरोध, पक्ष मशिदींचे रक्षण करणार – आठवले

| Updated on: Apr 29, 2022 | 9:41 AM

मशिदिवरील भोंगे काढण्यासाठी रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. तीन मेपासून आमचे कार्यकर्ते मशिदिचे रक्षण करतील असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी तीन मे चा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या काही नेत्यांकडून देखील राज ठाकरे यांचे समर्थ करण्यात आले आहे. आता या वादात आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यास विरोध केला असून, तीन मे पासून आमचे कार्यकर्ते मशिदिंचे रक्षण करतील असे म्हटले आहे.