Organizer Magazine : ‘भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे?’ ‘ऑर्गनायजर’मधल्या ‘त्या’ लेखाने राजकीय वादंग

Organizer Magazine : ‘भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे?’ ‘ऑर्गनायजर’मधल्या ‘त्या’ लेखाने राजकीय वादंग

| Updated on: Apr 07, 2025 | 9:45 AM

Organiser Magazine Controversy : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र 'ऑर्गनायजर'मधून प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे राज्यात राजकीय वादंग सुरू झालं आहे. यानंतर हा लेख मागे घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायजर’ मधल्या एका लेखमुळे वादंग निर्माण झालं आहे. या लेखातून कॅथेलीक चर्चकडे असलेल्या जमिनीकडे बोट दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम समाजानंतर आता सरकारचा मोर्चा कॅथेलीक समाजाकडे वळणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

‘ऑर्गनायजर’च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या एका लेखामुळे राजकीय वादंग निर्माण झालं आहे. हे वादंग निर्माण झाल्यानंतर आता हा लेख मागे घेण्यात आला आहे. ‘भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे?’ असं या लेखाचं शीर्षक आहे. सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे की कॅथेलीक चर्चकडे? असा प्रश्न या लेखातून उपस्थित करण्यात आला आहे. इतकंच नाही तर कॅथेलीक संस्थांकडे 7 कोटी हेक्टर जमीन असल्याचा दावा देखील या लेखात केलेला आहे. कॅथेलीक  संस्था ही सर्वात जास्त जमीन असणारी बिगर सरकारी संस्था आहे. कॅथेलीक चर्चची सर्वाधिक जमीन ब्रिटिशांच्या काळात ताब्यात गेल्याचा उल्लेख लेखात आहे. आता या लेखामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. वक्फ बोर्डानंतर आता सरकारचं लक्ष कॅथेलीक चर्चकडे लागलं आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर टीका करत आता मुस्लिम समाजाच्या जमिनी झाल्या आता कॅथेलीक समाजाच्या जमिनी घेण्याचा सरकारचा हेतु असल्याचं म्हंटलं आहे.

Published on: Apr 07, 2025 09:38 AM