Padma Awards 2026 | पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद, लोकांच्या प्रशंसेसाठी नाही…

| Updated on: Jan 26, 2026 | 2:28 PM

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे देखील नाव आहे. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही असं भगतसिंग कोश्यारी यांनी म्हंटलं आहे. मी देशासाठी काम करतो आणि यापुढेही करत राहणार असंही कोश्यारी म्हणाले.

सरकारने 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये पाच पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 16 सन्मान मरणोत्तर प्रदान केले जात आहेत. अभिनेते धर्मेंद्र आणि मामूटी, न्यायाधीश केटी थॉमस आणि राजकारणी व्हीएस अच्युतानंदन, गायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा हे प्रमुख आहेत.
पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे देखील नाव आहे. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही असं भगतसिंग कोश्यारी यांनी म्हंटलं आहे. मी देशासाठी काम करतो आणि यापुढेही करत राहणार असंही कोश्यारी म्हणाले.

Published on: Jan 26, 2026 02:28 PM