Pahalgam Attack : पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला…
पहलगामचा हल्ला पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर यानेच घडवून आणल्याचा पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्यांचा दावा आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यापूर्वी असीम मुनीरची भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये समोर आली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अशातच पाकिस्तानविरोधात भारताकडून अनेक कठोर पाऊलं उचलली जात असताना पाकच्या लष्कर प्रमुखालाच धडकी भरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताविरोधी कुरापती काढणारा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा भितीने लपून बसल्याची चर्चा आहे. असीम मुनीर हा एका गुप्त ठिकाणी असलेल्या बंकरमध्ये दडी मारून बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पहलागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात असीम मुनीर यांचं नाव समोर येत असून आता पाकिस्तानी नागरिक देखील असीम मुनीर यांच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच भेदरलेला असीम मुनीर लपून बसल्याची माहिती आहे.
Published on: May 05, 2025 10:36 AM
