Indus Water Treaty : पाण्यासाठी ‘पाक’ तरसणार… ‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला… पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’

Indus Water Treaty : पाण्यासाठी ‘पाक’ तरसणार… ‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला… पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’

| Updated on: Apr 25, 2025 | 7:52 PM

सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर मोठी कारवाई करत सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच थयथयाट पाहायला मिळाले. दरम्यान, सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानं याचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे. अशातच सिंधू जल वाटप कराराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांच्यात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये भारत सरकार सिंधू जल वाटप कराराच्या स्थगितीची अंमलबजावणी नेमकी कशी करणार याची मोठी बातमी समोर आली आहे. या बैठकीनंतर जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. तर सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर जागतिक बँकेला देखील यांची संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचं जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 25, 2025 07:52 PM