Talking Crow Video : ‘काका आहे का गं?’ बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा माणसाळलेला कावळा tv9 मराठीवर…
पालघर मधील या कावळ्याला काळ्या या नावाने हाक मारली जाते. तो अगदी माणसाळलेला असून संपूर्ण घरात फिरतो, खातो त्याने प्रत्येकाला आपलेस केले आहे.
आपण बऱ्याचदा पाळलेल्या पोपटांची बडबड, त्यांच्या गप्पा सोशल मिडियावर पाहिल्यात. हे पाळीव पोपट ज्या घरात पाळलेले असतात त्या कुटुंबाचा एक भागच होऊन जातात. इतकंच नाहीतर तर ते पोपट आपल्या मालकाला आवाज देऊन त्यांच्याशी गप्पा मारतात त्यांना आवाज देतात. मात्र तुम्ही कधी पोपटाप्रमाणे कावळ्याला माणसांप्रमाणे बोलताना ऐकलंय का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. जो पाहिला नंतर तुमची बोलतीच बंद होईल. कारण हा कावळा चक्क माणसांप्रमाणे बोलतो आणि आवाज देताना दिसतोय. पालघर जिल्ह्यातील एका गावात हा बोलणारा कावळा असल्याचे सांगितले जात आहे. पालघरमधील शहापूर तालुक्यातील गारगावं या ठिकाणी हा बोलणारा कावळा आहे. या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा माणसाळलेला कावळा असून मुकणे यांना तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्यांच्या घराजवळ हा कावळा आला होता. यावेळी तो अवघ्या काही दिवसांचा होता, असे सांगितले जात आहे. हा कावळा आई, बाबा, काका दादा अशी हाक मारतो. माणसांप्रमाणे बोलणारा हा कावळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. बोलक्या कावळ्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही देखील नक्कीच पाहायला हवा.
