Pankaja Munde यांचा नांदेडमधून शिवशक्ती यात्रा सुरु

Pankaja Munde यांचा नांदेडमधून शिवशक्ती यात्रा सुरु

| Updated on: Aug 30, 2023 | 3:57 PM

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती यात्रा जपासून सुरु झाला आहे. ही यात्रा अनेक जिल्ह्यांमधून जाणार आहे.

नांदेड : मागच्या दोन महिन्यापासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहा पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. यात्रा दिवसाच्या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होईल. त्यानंतर नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी आणि त्यासोबत शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गा मातेच्या दर्शनासाठी असल्याने हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जात आहे. पण दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.

‘आज मी नतमस्तक झाले मी मनभरून दर्शन केले देवीचं मला पावेल. कोणाची तुलना माझ्याशी नाहीच. आज देवाच्या ठिकाणी राजकारणावर बोलणार नाही. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनाचा सण आपले कुलदैवत असलेल्या माहुरच्या रेणुका माता मंदिरात साजरा केला. पंकजा मुंडे यांनी आपले मानसबंधु महादेव जानकर यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केलंय. यावेळी जानकर यांनी ओवाळणी टाकत आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन आनंदाने साजरा केला.

Published on: Aug 30, 2023 03:57 PM