Special Report | परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या गुप्त बैठकीत नेमकं काय शिजलं?

| Updated on: Nov 30, 2021 | 5:44 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हे चांदीवाल कमिशनसमोर (Chandiwal Commission) चौकशीला जाण्यापूर्वी भेटल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse-Patil) यांनी दिली.

Follow us on

मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हे चांदीवाल कमिशनसमोर (Chandiwal Commission) चौकशीला जाण्यापूर्वी भेटल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse-Patil) यांनी दिली. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय, हे नियमाला धरून नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत, अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली होती.