पिंपरी चिंचवड मध्ये उबेर शेअर बाईक चालकांना रिक्षा चालकांकडून गंभीर मारहाण,दोघांना अटक

पिंपरी चिंचवड मध्ये उबेर शेअर बाईक चालकांना रिक्षा चालकांकडून गंभीर मारहाण,दोघांना अटक

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 10:12 AM

पिंपरी चिंचवड मधील पुनावळे गावात उबेर शेअर बाईक चालकांना रिक्षा चालकांकडून गंभीर मारहाण केल्यानं दोघांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड मधील पुनावळे गावात उबेर शेअर बाईक चालकांना रिक्षा चालकांकडून गंभीर मारहाण केल्यानं दोघांना अटक करण्यात आली आहे.  शरण बसप्पा पांचाळ आणि हनुमंत माने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.तर, एक आरोपी फरार झाला आहे.आरोपी रिक्षा चालकांनी फिर्यादी कृष्णा व उत्तम कर्डिले या दोघांना उबेर बाईक शेअर या मोबाईल ॲप्लिकेशनवरुन बोलावून घेत रिक्षा चालकांनी त्यांना धमकावले व ‘आम्ही उगीच रिक्षाचे परमिट काढतो का ? तू आमचे सिट घेऊन जातो,’ असे म्हणत लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी कृष्णा यांना एका आरोपीने सिंमेटचा ब्लॉक मांडीवर मारुन खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शर्टाची कॉलर पकडली व मोबाईलवर दगड टाकून तो स्वतःलाच फोडायला लावला तसेच फिर्यादी कृष्णा यांना शिवीगाळ करून पुन्हा उबेर शेअर बाईक मध्ये काम केलंस तर जीवे मारु अशी धमकी दिली