Pune | नीरज चोप्राच्या यशामुळे बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंकडून साखर वाटत आनंदोत्सव

| Updated on: Aug 07, 2021 | 8:19 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुवर्णपदक विजेत्या नीरजचं कौतुक केलं आहे. तसेच नीरज चोप्राच्या यशामुळे बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंनी साखर वाटत आनंदोत्सव साजरा केला.

Follow us on

भारताचा खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदकं मिळवलं असून गेल्या 13 वर्षांपासूनचा देशाचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला आहे. त्याला संपूर्ण देशानं आशीर्वाद द्यावा, असं नीरज चोप्राचे वडील म्हणाले आहेत. नीरज चोप्राच्या वडिलांशी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील त्यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. नीरजनं पदक मिळवल्यानंतर त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. नीरज चोप्रानं भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. अभिनव बिंद्रानंतर भारताला तब्बल 13 वर्षानंतर सुवर्णपदक मिळालं आहे. नीरजच्या यशाबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय. नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्याचं अभिनंदन करत 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाला सुरुवात झाली. हरियाणाच्या मंत्र्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हरियाणाच्या मंत्र्यांनी आनंदाच्या भरात डान्स केला. तर, देशात सगळीकडे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातदेखील या यशाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरजचं कौतुक केलं आहे. तसेच नीरज चोप्राच्या यशामुळे बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंनी साखर वाटत आनंदोत्सव साजरा केला. (players celebrated Neeraj’s Golden victory by distributing sugar At the District Sports Complex in Baramati)