Pahalgam Terror Attack : ‘आपल्याकडे वेळ कमी’, मोदींचं सूचक विधान, पाकिस्तानने घेतला धसका; नेमकं काय होणार?

Pahalgam Terror Attack : ‘आपल्याकडे वेळ कमी’, मोदींचं सूचक विधान, पाकिस्तानने घेतला धसका; नेमकं काय होणार?

| Updated on: Apr 29, 2025 | 7:04 PM

पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा या हल्ल्यामागे मुनीर यांचा हात असल्याचं म्हणतात. मुनीर यांनी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी हल्ला घडवून आणला असं आदिल यांनी म्हंटलंय. एकंदरीत हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानी, गोळीबार करणारे पाकिस्तानी, भडकवणारे लष्कर प्रमुख पाकिस्तानीच आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या तपासात हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावेच पुरावे बाहेर येत आहेत

आपल्याजवळ वेळ कमी आहे, लक्ष मोठं असल्याचं सूचक वक्तव्य उद्याच्या सीसीएसच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तर भारत हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना देखील भीती आहे. अस्तित्वाचा प्रश्न आला तर अण्वास्त्रांचा पर्याय आहे, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हंटले आहे. मात्र आता पाकिस्तानला भारताने हल्ला करण्याची भीती आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आता आपल्याला सोडणार नाही अशी भीती पाकिस्तानला आहे. येत्या दोन ते चार दिवसात भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती येऊ शकते, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात पुरावे बाहेर येत असल्याने पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. गोळीबार करणारा मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सेनेत होता हे आता समोर आलंय. मुसा हल्ल्या आधी रेकी करतानाचा व्हिडिओ पर्यटकांच्या कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला टीआरएफने घेतली होती. टीआरएफचा प्रमुख सैफुल्ला कसूरी हा पाकिस्तानी आहे. सैफुल्ला कसूरी लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ आहे.

हाशिम मुसा लष्करे तैयबा साठी काम करायचा. पहलगाम हल्ल्यात ३ अतिरेकी पाकिस्तानी होते. अबू तल्हा, सुलेमान शहा आणि आसिफ उर्फ हाशिम मुसा हे तीनही पाकिस्तानी अतिरेकी होते. हल्ल्या आधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी भारताबद्दल भडकाऊ वक्तव्य केलं होत. काश्मीरच्या स्वातंत्र्याचा लढा आम्ही सोडणार नाही. असा मुनीर यांचा आशय होता. काश्मीर ही आमच्या गळ्याची नस आहे असं मुनीर म्हणाले.

Published on: Apr 29, 2025 07:04 PM