Trump Teriff :  ट्रमच्या कर वाढीच्या धमकीनंतर भारतानं अमेरिकेला सुनावलं अन् ‘ती’ आठवणही दिली करून

Trump Teriff : ट्रमच्या कर वाढीच्या धमकीनंतर भारतानं अमेरिकेला सुनावलं अन् ‘ती’ आठवणही दिली करून

| Updated on: Aug 05, 2025 | 12:45 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात ७ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर आणि रशियाकडून होणाऱ्या संरक्षण आणि ऊर्जा आयातीवर अनिर्दिष्ट दंडाची घोषणा केली आणि भारतानंही चांगलंच सुनावलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर आणखी टॅरिफ लावणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोकं मरत आहेत? याची भारताला पर्वा नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कर वाढीची धमकी दिल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक स्टेटमेंट जारी करण्यात आलंय. भारताला लक्ष्य करणं हा अन्याय आणि तर्कहीन असल्याचे म्हणत भारताने अमेरिकेला सुनावलं आहे. इतकंच नाहीतर यावेळी अमेरिका रशियाकडून काय खरेदी करते याची आठवण भारताने अमेरिकेला करून दिली. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच भारत त्यांच्या राष्ट्रीय हितांचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल. अमेरिका अजूनही अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराईड, त्यांच्या ईव्ही उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने रशियाकडून आयात करते, असं म्हणत भारतानं अमेरिकेला चांगलंच फटकारलंय.

Published on: Aug 05, 2025 12:45 PM