Modi 3.0 Cabinet : पंतप्रधान मोदींचं 3.O कॅबिनेट कसं असणार? कोणत्या दिग्गजांनी घेतली शपथ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील एनडीएच्या सरकारला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती भवनात तब्बल ७२ नेत्यांचा शपथविधी झाला. त्यांच्या शपथेनंतर भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार का याचीही चर्चा सध्या सुरू आहे. बघा नेमंक मोदींचं ३.० कॅबिनेट कसं असणार? बघा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील एनडीएच्या सरकारला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती भवनात तब्बल ७२ नेत्यांचा शपथविधी झाला. भाजपकडून राजनाथ सिंह यांनी मोदींनंतर शपथ घेतली. २०१९ मध्ये राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे करार झालेत. त्यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. २०१९ मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्री आणि सहकार खातं होतं. केंद्रीय गृहमंत्री म्हणून भाजपचे रणनीतीकार म्हणून ते ५ वर्ष आघाडीवर आहेत. मोदींनंतर चौथी शपथ नितीन गडकरी यांनी घेतली. २०१९ मध्ये रस्तेविकास मंत्री, रस्ते महामार्गांचं विणलेलं जाळं, निधीची उपलब्धता आणि कायम सकारात्मकता दृष्टीकोन ही गेल्या टर्मची त्यांची खासियत आहे. पाचव्या नंबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथेनंतर भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार का याचीही चर्चा सध्या सुरू आहे. बघा नेमंक मोदींचं ३.० कॅबिनेट कसं असणार?
