तपास यंत्रणांना विरोधक बदनाम करतात, कारवाई केल्यावर प्रकरणाला धर्माचा रंग देतात – PM Narendra Modi

तपास यंत्रणांना विरोधक बदनाम करतात, कारवाई केल्यावर प्रकरणाला धर्माचा रंग देतात – PM Narendra Modi

| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 9:33 PM

भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडीविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला.

नवी दिल्ली : आज पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात काँग्रेस पुरती सपशेल झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाशी आणि भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडीविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला. आज अजून एक विषय मी लोकांसमोर ठेवतोय. भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. कारण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी यावर भाष्य केले होते. मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊशी जोडला जातोय असा आरोप पवारांनी केला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर कोर्टाच्या निर्णयावरही सवाल उपस्थित केले आहेत. त्याचाही मोदींनी आज समाचार घेतला आहे.