PM Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा

PM Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा

| Updated on: Jan 26, 2026 | 9:32 AM

आज भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार परेडपूर्वी, पंतप्रधानांनी ट्विट करत भारताच्या अभिमान आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या या राष्ट्रीय सणाने नवी ऊर्जा व त्साह निर्माण होवो, तसेच विकसित भारताचा संकल्प दृढ होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

आज भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या राष्ट्रीय पर्वाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीतील इंडिया गेट जवळील कर्तव्य पथावर सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या शानदार परेडपूर्वी, पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक संदेश जारी केला.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेला हा राष्ट्रीय सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ होवो.” पंतप्रधानांच्या या संदेशातून देशाच्या प्रगती आणि एकजुटीवर भर देण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचा सन्मान करणारा दिवस असून, या निमित्ताने देशाच्या गौरवशाली इतिहासाचे आणि उज्ज्वल भविष्याचे स्मरण केले जाते. पंतप्रधानांच्या शुभेच्छांमुळे या दिनाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Published on: Jan 26, 2026 09:32 AM