नाशिकमध्ये उपमहापौरासह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा फोडाफोडीला वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) 4 नगरसेवक शिवसेनेच्या (Shiv Sena) गळाला लागल्याचे समजते.
नाशिकः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा फोडाफोडीला वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) 4 नगरसेवक शिवसेनेच्या (Shiv Sena) गळाला लागल्याचे समजते. मुंबईत आज मातोश्रीवर हे नगरसेवक शिवबंधनात अडकणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका केली. या आरोपाला शिवसेनेने हे राजकीय उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काळात नगरसेवकांच्या फोडाफोडीला पुन्हा वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातले आहे.
Published on: Feb 25, 2022 12:21 PM
