सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांची बॅनरबाजी

| Updated on: Dec 27, 2025 | 10:25 AM

ठाण्यात भाजपने नमो भारत नमो ठाणे बॅनर लावून प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीय सेनेने सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे असा वादग्रस्त बॅनर लावला आहे. या बॅनरमुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान वाद निर्माण होण्याची शक्यता असून, राजकीय वातावरण तापले आहे.

ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बॅनर लावून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. नमो भारत नमो ठाणे असा उल्लेख असलेले हे बॅनर कमळाच्या चिन्हासह प्रदर्शित करण्यात आले आहेत. एकीकडे ठाण्यात राजकीय प्रचाराला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे मुंबईतील शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांकडून पुन्हा एकदा बॅनरबाजी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे #BMC असा आक्रमक आशय या बॅनरवर छापण्यात आला आहे. उत्तर भारतीय सेनेने लावलेल्या या बॅनरमुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बॅनरवरील मजकूर हा उत्तर भारतीयांना एकत्र येण्याचे आवाहन करणारा असून, एक प्रकारे राजकीय शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.

Published on: Dec 27, 2025 10:25 AM