VIDEO : Sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निकालावर राणे समर्थकांची पोस्टरबाजी

VIDEO : Sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निकालावर राणे समर्थकांची पोस्टरबाजी

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 3:42 PM

फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दिसत आहे. तर वाघ या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करु पाहतोय. मात्र मंत्री नारायण राणे वाघाला त्याची शेपटी धरून बाहेर फरफटत नेत असल्याचं दिसतंय. या वाघाला राणे बँकेपर्यंत पोहोचू देत नसल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलंय.

फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दिसत आहे. तर वाघ या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करु पाहतोय. मात्र मंत्री नारायण राणे वाघाला त्याची शेपटी धरून बाहेर फरफटत नेत असल्याचं दिसतंय. या वाघाला राणे बँकेपर्यंत पोहोचू देत नसल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलंय. या फोटोच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असून सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रभर हा फोटो व्हायरल होतोय. कोणताही शब्द न वापरता शिवसेनेला खिजवण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.