Nagpur Video :  दोन महिला अधिकारी नळावर भांडतात तशाच भांडल्या, एकीने दुसरीला कोपराने ढोसलं… गडकरींसमोरच हे काय घडलं?

Nagpur Video : दोन महिला अधिकारी नळावर भांडतात तशाच भांडल्या, एकीने दुसरीला कोपराने ढोसलं… गडकरींसमोरच हे काय घडलं?

| Updated on: Oct 25, 2025 | 12:53 PM

नागपूरमधील एका सरकारी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये पोस्टमास्टर जनरल पदावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. शोभा मधाळे यांची बदली झाली असून, नवी मुंबईच्या सुचिता जोशी यांच्याकडे नागपूरचा तात्पुरता प्रभार सोपवण्यात आला आहे.

नागपूर येथे आयोजित एका सरकारी कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये सार्वजनिकरित्या धुसफूस झाल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही बाब उघडकीस आली. पोस्टमास्टर जनरल पदावरून अधिकाऱ्यांमधील हा वाद चव्हाट्यावर आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणानुसार, पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्यातील धारवाड येथे बदली झाली आहे. या बदलीनंतर नागपूर पोस्ट विभागाचा प्रभार कोणाकडे असणार, यावरून हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नव्या नियुक्ती होईपर्यंत, नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे नागपूरचा संपूर्ण प्रभार सोपवण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून, लवकरच या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात येणार आहे. सरकारी कार्यक्रमातच अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद समोर आल्याने या घटनेची दखल घेण्यात आली आहे.

Published on: Oct 25, 2025 12:53 PM