इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे! प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे! प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2025 | 2:55 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर विविध राजकीय मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगावरही आंबेडकरांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर विविध राजकीय मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगावरही आंबेडकरांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणाले, निवडणूक आयोग स्वतः मूर्खपणा करत आहे. काँग्रेस पक्षात एकजूट दिसत नाही, वेगवेगळे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात जाण्यासाठी पत्र लिहिले होते, पण त्यावेळी कोणीही साथ दिली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली, तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी इंडिया आघाडीला आवाहन केले की, जर तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही पंतप्रधान मोदींना घाबरत नसाल, तर या लढ्यात सहभागी व्हा.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल यात्रे’वर टीका करताना आंबेडकर म्हणाले, या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण नव्हे, तर त्यामागे राजकीय स्वार्थ आहे. त्यांनी पुढे सांगितले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी समाज हा श्रीमंत मराठ्यांविरुद्ध आहे, आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा आहे, असा आरोप त्यांनी केला.

Published on: Aug 10, 2025 02:55 PM