Malik Vs Darekar : ‘बेताल वक्तव्ये करणाऱ्या मलिकांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही’

Malik Vs Darekar : ‘बेताल वक्तव्ये करणाऱ्या मलिकांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही’

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 5:08 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. ईडी (ED) कोणाच्याही मागे लागत नाही, असेही दरेकर म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. ईडी (ED) कोणाच्याही मागे लागत नाही. जिथं जळत असेल तिथं धूर निघेल. आपले कारनामे उघड होतील, ही भीती त्यांना वाटतेय म्हणूनच अशी बेताल वक्तव्ये ते करत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय संस्थांचा गैरवापर भाजपा (BJP) सरकार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.