कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईतं, एसटीचे राज्य शासनात विलगीकरणाबाबत प्रविण दरेकरांची राज्य सरकारवर टीका
Pravin darekar

“कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईतं”, एसटीचे राज्य शासनात विलगीकरणाबाबत प्रविण दरेकरांची राज्य सरकारवर टीका

| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 8:25 PM

मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत. भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईल.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत. भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईल. एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचं, हे चुकीचं असल्याचं दरेकर म्हणाले.

संजय राऊत यांचं कोणतही रचनात्मक कामाच्या बाबतीतल वक्तव्य माझ्या ऐकिवात नाही. ते केवळ राजकीय टीका टिप्पणी, जुमलेबाजी आणि तुसडेपणानं बोलत राहतात. उपरे टुपरे बोलून आपल्या बोलण्याची हौस भागवून घेण्याचं काम राऊत करतात, असं दरेकर म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत. ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं, असा सवाल दरेकर यांनी केला.