Kolhapur Rain | पावसामुळे वातावरणात गारवा, कोल्हापूरकर सुखावले

| Updated on: Jun 02, 2022 | 9:40 PM

दरम्यान जोरदार वाऱ्यासह काही वेळातच पाऊस सुरु झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. केवळ अर्धा तासच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले.

Follow us on

कोल्हापूर: उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) जनतेला आज अवकाळी पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीजांची कडकडीट आणि ढगांच्या गडगडाटात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा पसरला. दरम्यान जोरदार वाऱ्यासह काही वेळातच पाऊस सुरु झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. केवळ अर्धा तासच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात असह्य उकाडा (heat) होता. त्यामुळे अंगाची होणारी ल्हाई यामुळे हैराण झाले होते. आज दुपारी अचानक वातावरणात गर्मी वाढत गेली आणि सायंकाळी 4 नंतर आकाशात ढगांनी घर करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या धुवाँधार पावसाने (torrential rain) शहर व परिसराला झोडपून काढले. दरम्यान महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटींग केली.