रमीचा राडा! धुळ्यात कोकाटे समर्थक – विरोधक आमनेसामने

रमीचा राडा! धुळ्यात कोकाटे समर्थक – विरोधक आमनेसामने

| Updated on: Jul 25, 2025 | 1:12 PM

धुळे येथील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेलबाहेर सकाळपासून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

धुळे येथील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेलबाहेर सकाळपासून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनीही हॉटेलबाहेर मोठी गर्दी जमवली होती. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ उत्साहाने घोषणा दिल्या. यामुळे हॉटेल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. कोकाटे यांच्या समर्थकांनी आरोप केला की, विरोधक केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी या ठिकाणी नाटकीय प्रदर्शन करत आहेत.

त्यानंतर माणिकराव कोकाटे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना बाबळे फाट्याजवळ शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने झाली. यावेळी कोकाटे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Published on: Jul 25, 2025 01:09 PM