Pune Ambil Odha : पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाई, नागरिकांच्या संत्पत प्रतिक्रिया LIVE

Pune Ambil Odha : पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाई, नागरिकांच्या संत्पत प्रतिक्रिया LIVE

| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 12:55 PM

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली.

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आंबिल ओढ्यातील नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अनेक घरांमधील सामान बाहेर काढले नसतानाही पालिकेकडून घरांवर बुल्डोझर चालवण्यात आला. कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.