आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली : अजित पवार
दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार करु, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुंबई : आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय आहे. पण आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. आज बऱ्याच महिन्यानंतर नाट्यगृह सुरु झाले आहेत. कोरोनाने लोकांमध्ये निराशा आली होती. निसर्गापुढे कुणाचं चालत नसतं. पण आता तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार करु, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Published on: Oct 22, 2021 11:18 AM
