Ajit Pawar | ओमिक्रॉनमुळं पुण्यात तीन दिवसातच पुन्हा निर्बंध कडक – अजित पवार

Ajit Pawar | ओमिक्रॉनमुळं पुण्यात तीन दिवसातच पुन्हा निर्बंध कडक – अजित पवार

| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 7:51 PM

ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता एक डिसेंबरपासून 100 टक्के सुरू होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत.

ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता एक डिसेंबरपासून 100 टक्के सुरू होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 25 टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये 50 टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी 48 तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.