Fursungi Elections : 3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक… राजकारणापलीकडच्या मैत्रीची पुण्याच्या फुरसुंगीत चर्चा
पुण्यातील फुरसुंगीत पहिल्यांदाच होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तीन वर्गमित्र वेगवेगळ्या पक्षांतून रिंगणात उतरले आहेत. मैत्री जपतानाच राजकीय लढत सुरू आहे. अजित पवार गटाची राष्ट्रवादी अनेक महापालिकांमध्ये स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे, तर अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार गजानन लवटे यांच्या मुलानेही उमेदवारी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वातावरण तापले असून, विविध ठिकाणी रंजक आणि लक्षवेधी लढती पाहायला मिळत आहेत. पुण्यातील फुरसुंगी येथे पहिल्यांदाच होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एक प्रभाग, एक जागा आणि एकाच वर्गातील तीन मित्र वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोस्तीत कुस्ती नाही, असे म्हणत हे तिघेही खेळीमेळीमध्ये निवडणुकीचा सामना करत आहेत. भाजपकडून विराज करसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गिरीश ढोरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी या तीन मित्रांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या तिघांपैकी एक वकील, दुसरा इंजिनियर आणि तिसरा उद्योजक आहे. त्यांची मैत्री राजकारणापलीकडची असल्याचे सांगितले जाते. फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी प्रभाग एकमधून हे तिघेही उमेदवार आहेत.
Published on: Dec 20, 2025 12:11 PM
