उचलून आदळलं, बेदम मारलं… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडीओ; अजित दादा म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडून एका जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदोरे यांच्याकडून जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडून एका जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या मारहाणीत जेष्ठ नागरिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तर भर दिवसा एका नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समजल्यानंतर पुण्यात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. याआधी देखील बाबुराव चांदेरे यांनी एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता जेष्ठ व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे म्हटले आहे.
