पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागांच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट, बघा व्हिडीओ

| Updated on: May 23, 2023 | 2:35 PM

VIDEO | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागांच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास, बघा कशी केलीये पुष्पसजावट

Follow us on

पुणे : दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांचा वापर करून शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे रूप आज पुणे येथे विराजमान झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृती साकारत मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयोग तरुण मंडळ तर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यांसह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविध रंगी भव्य फुलांच्या प्रतिकृती साकारून सजावट करण्यात आली आहे. आज श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मक गणेश अवतार झाला होता. या निमित्ताने ही सजावट करण्यात आली आहे, गणेश जयंती निमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला त्यानंतर पहाटे चार वाजता गायकर ऋषिकेश रानडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्वराभिषेकातून गणराया चरणी स्वरसेवा अर्पण केली तसेच दगडूशेठ मंदिरात गणेशयाग सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पाडण्यात आले