Chandrakant Patil : गुंड निलेश घायवळवर एकच सवाल अन् चंद्रकांत दादांनी बोलणं टाळलं; म्हणाले, I Am Sorry!

Chandrakant Patil : गुंड निलेश घायवळवर एकच सवाल अन् चंद्रकांत दादांनी बोलणं टाळलं; म्हणाले, I Am Sorry!

| Updated on: Oct 06, 2025 | 5:45 PM

गुंड निलेश घायवळच्या प्रकरणात चंद्रकांत पाटलांनी आय एम सॉरी अशी प्रतिक्रिया दिली. घायवळच्या घरी बीडच्या पवनचक्क्यांचे पेपर व काडतुसे सापडली. बनावट पासपोर्टद्वारे त्याच्या परदेशात पळून जाण्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

गुंड निलेश घायवळच्या परदेशगमनावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आय एम सॉरी अशी प्रतिक्रिया दिली आहे. घायवळ बनावट पासपोर्टद्वारे परदेशात पळून गेल्याचा आरोप आहे. त्याच्या पुण्यातील घरावर आणि कार्यालयावर कोथरूड पोलिसांनी छापा टाकला असता बीडमधील पवनचक्क्यांशी संबंधित महत्त्वाचे कागदपत्रे, तसेच दोन काडतुसे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत, की पाटलांच्या सहकार्यामुळेच घायवळ परदेशात पळून गेला. तसेच, अनिल देशमुख यांनीही धंगेकरांच्या वक्तव्याला पाठिंबा देत पाटलांवर टीका केली आहे. पुणेकरांनी पाटलांना अशा गुंडांना पाठीशी घालण्यासाठी मतदान केले का, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Published on: Oct 06, 2025 05:45 PM