पुण्यात मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यक्रमात मंचावर आला साप अन् …
पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळ्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, त्यांच्या आगमनापूर्वी मंचासमोर साप आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. साप मंचाखाली गेल्याने, मंत्री महोदयांच्या येण्यापूर्वी त्याला बाजूला करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते, यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

केंद्रीय संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री ज्या मंचावर बसणार तिथंच सापाचा शिरकाव झाल्याने यंत्रणा चांगलीच अडचणीत आली आहे. साप मंचाखाली गेला असून मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी साप बाजूला करण्याचं आव्हान यंत्रणासमोर आहे.
Published on: Oct 16, 2025 11:34 AM