Kishori Pednekar | राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे, शिंदे-फडणवीस सरकारला किशोरी पेडणेकरांचा टोला

| Updated on: Aug 15, 2022 | 3:12 PM

Kishori Pednekar | राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालल्याचा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

Follow us on

Kishori Pednekar | राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालल्याचा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांनी शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारला लगावला आहे. शिवसेना हा कुटुंबाप्रमाणे आहे. हा पक्ष सामाजिक कार्यातून मोठा झालेला पक्ष आहे.पक्षाची सामाजिक नाळ आजही जुळलेली आहे, ती घट्ट करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. आज स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नक्कीच दिल्लीतून येऊन येथे झेंडा फडकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पंतप्रधान म्हणून आदर आहेच, पण त्यांनी केंद्रात आणि राज्यातील मंत्रीमंडळात 50 टक्के अथवा किमान 33 टक्के तरी महिलांसाठी आरक्षण लागू करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.