“काँग्रेसचा अवतार आता संपलाय, तर मविआ सत्तेसाठी एकत्र”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

“काँग्रेसचा अवतार आता संपलाय, तर मविआ सत्तेसाठी एकत्र”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

| Updated on: Aug 03, 2023 | 2:41 PM

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. ठाकरे-केजरीवाल भेटीवरून विखे पाटील म्हणाले की, "विरोधकांच्या मूठ बांधणीला काही अर्थ नाही आहे, ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे.

अहमदनगर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. ठाकरे-केजरीवाल भेटीवरून विखे पाटील म्हणाले की, “विरोधकांच्या मूठ बांधणीला काही अर्थ नाही आहे, ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. त्यांना आपले स्वतःचे दुकाने बंद होण्याची भीती वाटत आहे, म्हणून ते एकत्र येत आहेत. ही सगळी मंडळी सत्तेसाठी एकत्र आहेत, त्यांना जनाधार नाही आहे”. काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात हायकमांडकडे धाव घेतली आहे. यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचा अवतार आता संपलेला आहे. कर्नाटक हा अपवाद होता. महाराष्ट्रात काँग्रेसला कधीच स्थान नव्हतं, असं विखे पाटील म्हणाले.

Published on: May 26, 2023 11:50 AM