Rahul Gandhi :  फ्लॅट नंबर 0, वडिलांचे नाव ytdtr; निवडणुकीत गौडबंगाल, राहुल गांधींकडून थेट पुरावा, बघा खळबळजनक दावा काय?

Rahul Gandhi : फ्लॅट नंबर 0, वडिलांचे नाव ytdtr; निवडणुकीत गौडबंगाल, राहुल गांधींकडून थेट पुरावा, बघा खळबळजनक दावा काय?

| Updated on: Aug 07, 2025 | 3:58 PM

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यांनी देशातील निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले, असाही दावा केला.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज गुरुवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले.  निवडणूक आयोगाने गेल्या काही निवडणुकांमध्ये गौडबंगाल केल्याचा आरोप राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दाखवून केला. यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांची कथित मतदार यादी दाखवली ज्यामध्ये एकाच पत्त्यावर अनेकांची नावे नोंदवली गेली होती. इकतंच नाहीतर जी यादी राहुल गांधींकडून दाखवण्यात आली त्यामधील मतदार यादीतील मतदारांची माहिती बघून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. जी मतदार यादी राहुल गांधींनी  दाखवली ज्यामध्ये अनेक मतदारांचा फ्लॅट नंबर, खोली क्रमांक शून्य असा लिहिलेला होता आणि वडिलांचे नावही चुकीचे होते. एका मतदाराच्या वडिलांचे नाव dfojgaidf  तर एकाच्या वडिलांचे नाव चक्क ytdtr असे लिहिल्याचे पाहायला मिळाले.

पुढे राहुल गांधी असंही म्हणाले की, महाराष्ट्रात, ५ महिन्यांत ५ वर्षांपेक्षा जास्त मतदारांची भर पडल्याने आमचा संशय अधिकच बळावला आणि त्यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदानात मोठी वाढ झाली. विधानसभेत आणि लोकसभेत आमचा पराभव झाला हे अत्यंत संशयास्पद आहे. तर लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान एक कोटी नवीन मतदार जोडले गेले असे आम्हाला आढळले. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आणि लेख लिहून आम्हाला हेच म्हणायचं होतं की महाराष्ट्र निवडणूक चोरीला गेलंय, असं म्हणत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पुरावेच दाखवले.

Published on: Aug 07, 2025 03:47 PM