Ratnagiri | रत्नागिरीत पाऊस सुरुच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 14, 2021 | 1:27 PM

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झालीय. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 104 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यात शंभर मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे.

Follow us on

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झालीय. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 104 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यात शंभर मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात 150 मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. रत्नगिरी तालुक्यातील बाव नदी इशारा पातळी बाहेर वहात आहे.